|

कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने कबुतरांना खाद्य टाकनाऱ्यांवर कारवाई…

लोकनीति न्युज नेटवर्क

शिवणे : कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने डहाणूकर कॉलनी, कोथरूड गावठाण परिसर तसेच लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये जंगली पारव्याना खाद्य टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. गांधीभवन आरोग्य कोठी मध्ये कार्यरत असलेले महानगरपालिकेचे मोकादम वैजीनाथ गायकवाड तसेच अण्णा ढावरे यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती मिळाली होती. लक्ष्मीनगर येथील काही किराणा दुकानदार कबुतरांना नेहमी धान्य टाकत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पारव्यांना कोणीही खाद्य टाकू नये अशा सूचना देखील यावेळी देण्यात आल्या. पारव्यांच्या विष्ठेपासून तसेच पिसांपासून होणाऱ्या त्रासांबद्दल नागरिकांची जनजागृती केल्यामुळे कोथरूड भागात कबुतरांच्या ढाबळ बंद केल्याचे दिसत आहे, त्यामुळे कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय हे ढाबळमुक्त दिसून येत आहे. मनपा प्रशासनाच्या वतीने कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते, त्या अनुषगांने पाच नागरिकांवर कारवाई करण्यात आली. कोथरूड परिसरात आरोग्य निरिक्षक करण कुंभार, सचिन लोहकरे, मोकादम वैजीनाथ गायकवाड व अण्णा ढावरे यांनी कबुतरांना दाणे टाकनाऱ्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपये दंड स्वरूपात शुल्क वसूल केले आहेत. सदर कारवाई महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!