
लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : गणपती माथा पासून शिवणे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ मोठी झाडे पाणी न मिळाल्यामुळे वाळल्याने पर्यावरण प्रेमिंकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या वतीने दुर्लक्ष झाल्याने आणि अनेक दिवसांपासून झाडांना पाणी न मिळाल्यामुळे येथील अनेक झाडे उन्हाळ्याच्या सुरवातीलाच सुकली आहेत.

पाण्याअभावी सुकलेल्या झाडांची शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांनी दखल घेतली आहे. गणपती माथा ते कोंढवे गेट पर्यंत रस्त्यावरील सर्व झाडांची देखभाल करण्याची जवाबदारी शिवसेना पक्ष घेणार असल्याची माहिती शिवसैनिक संतोष शेलार यांनी दिली. स्वतःच्या खर्चाने पाण्याचा टँकर मागवून झाडांना पाणी देण्यात आले असून यापुढे देखील येथील सर्व झाडांची देखभाल शिवसेना पक्ष करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शिवसेना हवेली तालुका उपप्रमुख संतोष शेलार, निखिल जावळकर, विकास कांबळे, केतन धावडे हे शिवसैनिक उपस्थित होते.