
लोकनीती न्युज मीडिया
प्रतिनिधी : झैद शेख
शिवणे : शिवणे, कोंढवे धावडे, उत्तमनगर आणि कोपरे परिसरातील नागरिकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक गेल्या काही दिवसांपासून त्रस्त झाले होते. सकाळी घरातील कामात अडथळे, संध्याकाळी मुलांच्या अभ्यासात व्यत्यय आणि रात्री स्वयंपाकाच्या अडचणी – अशा अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या.

या समस्येकडे आमदार भीमराव तापकीर यांनी गांभीर्याने लक्ष दिले. त्याचबरोबर सचिन विष्णू दांगट यांनी सातत्याने पाठपुरावा करत महावितरणकडून नवीन वीज वाहिनीचे काम तातडीने सुरू करून घेतले.

मुठा नदीवरील या नव्या लाईनचे काम युद्धपातळीवर सुरू असून, आता प्रत्यक्ष त्या ठिकाणी वीज केबलही पोहोचली आहे. लवकरच या परिसराला अखंडित आणि स्थिर वीजपुरवठा मिळणार असून, नागरिकांना या त्रासातून मोठा दिलासा मिळणार आहे.