|

वारजे उड्डाणपुलाखाली वाहतूक कोंडी; कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे ट्रक खड्ड्यात अडकला

लोकनीती न्युज नेटवर्क

शिवणे : अत्यंत रहदारीचा असलेला वारजे उड्डाणपुला खालील कै. रमेशभाऊ वांजळे चौकात कंत्राटदाराच्या कामचलाऊ वृत्तीमुळे वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र सोमवारी सकाळी पहावयास मिळाले. वारजे पुलाखालील मुख्य चौकात मल निस्सारण वाहिनीचे काम चालू आहे ज्यासाठी खोदकाम करण्यात आले होते, परंतु हे बुजविण्यासाठी केवळ मातीचा वापर केल्यामुळे आणि कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा तसेच बॅरीगेट न लावल्यामुळे या जागेवरून अवजड वाहने जाऊन माती खाली खचल्यामुळे एक मोठा ट्रक खड्ड्यात अडकून वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला होता. सकाळ संध्याकाळ ह्या चौकातून लाखो वाहनांची रेल चेल असते अशामध्ये रस्त्याची कामे किव्वा गटारीची कामे करत असताना सुरक्षा यंत्रणांचा वापर करणे आवश्यक असताना अशी कोणतीही व्यवस्था येथे केली नसल्याचे दिसून आले. जवळच सिग्नल असल्याने सिग्नल सुटताच वाहने वेगाने निघतात ज्यामध्ये अशा खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एखाद्या ठिकाणी काम चालू असल्यामुळे रस्ता खोदला गेला तो लगेच बुजवला गेला परंतु नुसती माती असल्यामुळे तेथे लगेच खचणारच आहे. सुरक्षेसाठी त्या ठिकाणी बॅरिगेट्स लावणे गरजेचे होते परंतु ते न लावले गेल्यामुळे आणि नवीन चालकाला लवकर लक्षात येत नाही कुठला रस्ता कसा आहे त्यामुळे असे प्रकार वारंवार घडत आहेत पुणे मनपा ने ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी त्यांचा कर्मचारी थांबवणे गरजेचे आहे.
राजीव पाटील
सामाजिक कार्यकर्ते

विकास कामे होणे आवश्यकच आहे परंतु काम झाल्यावर रस्ते बुजवत असताना नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. वारजे वाहतूक नियंत्रण विभागात पोलिसांचे संख्याबळ कमी असल्याने ज्या कंपनी ला रस्त्याचे अथवा गटाराचे कंत्राट दिले आहे त्यांनी आपले प्रशिक्षित कामगार लावून पोलीसांबरोबर वाहतूक नियंत्रण करण्यासाठी मदत करावी.

रियाझ शेख
मनसे शाखाध्यक्ष, वारजे

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!