
शिवणे : उत्तमनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानात हभप मुरलीधर नाणेकर वय ९० आणि लीलाबाई नाणेकर वय ८२ यांचा सहस्रचंद्र दर्शन वर्षपूर्ती सोहळा कार्यक्रम हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. व्यक्तीचे वय ८० पुर्ण झाले की सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा केला जातो. म्हणजे त्याच्या आयुष्यात १००० पौर्णिमा येतात याचा अर्थ असा की त्याने ८० वर्षात १००० वेळा पुर्ण चंद्र बघितलेला असतो. उत्तमनगर गावचे माजी सरपंच सुभाष नाणेकर यांनी आपल्या आई वडिलांचा सहस्त्रचंद्रदर्शन वर्षपूर्ती सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी प्रसिध्द किर्तनकार डॉ. पंकज महाराज गावडे यांची कीर्तन सेवा झाली. कार्यक्रमाला पंचक्रोशितील १४ कीर्तनकरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पंकज महाराज गावडे यांचा खडकवासला मतदार संघाचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर आणि प्रभाकर मोहळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला माजी उपमहापौर दिलीप बराटे, रमेश कोंडे, श्रीरंग चव्हाण, शुक्राचार्य वांजळे, विकास दांगट, सचिन दोडके, किरण बारटक्के, सचिन दांगट, शैलेश कोंढाळकर, हरिदास चरवड, सुशील मेंगडे, बाबा धुमाळ, दत्ताभाऊ पायगुडे, अनिता इंगळे, अरुण राजवाडे, कॅप्टन हेळकर पाटील, सुरेश धावडे, अनिल कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते. कीर्तन ऐकण्यासाठी परिसरातील हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली होती.