|

कचरा वेचक गाड्या उपलब्ध; कचरा समस्येतून शिवणेकरांना दिलासा

लोकनीती न्युज नेटवर्क

शिवणे : मनपा मध्ये समाविष्ट झाल्यापासून शिवणे, उत्तमनगर, कोपरे, कोंढवे या गावांच्या विकासाकडे मनपा प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. येथे दररोज होणारी वाहतूक कोंडी, सर्वत्र मुख्य रस्त्यांवर जमा होणारा कचरा, पाण्याची समस्या अशा अनेक समस्यांमुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार निवेदने देऊन, तक्रारी करून देखील येथील नागरिकांना दिलासा मिळत नसल्याचे दिसत आहे. शिवणे, उत्तमनगर परिसरात कचऱ्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाकडे कचरा उचलण्यासाठी लागणाऱ्या वाहनांची असलेली कमतरता यामुळे स्वच्छता कर्मचारी सर्व भागात पोहोचू शकत नसल्यामुळे नागरीक घरात जमा झालेला कचरा रस्त्यावर आणून टाकत आहेत. रस्त्यावर जमा होणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधी तर पसरत आहेच परंतु अपघाताच्या घटना देखील वाढल्या आहेत. स्विकृत नगरसेवक सचिन दांगट यांनी कचरा समस्येसाठी मनपा आयुक्त राजेंद्र भोसले तसेच घन कचरा विभाग उपायुक्त संदीप कदम यांच्या बरोबर केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून मनपा प्रशासनाने शिवणे, उत्तमनगर भागासाठी कचरा उचलण्यासाठी दोन नविन गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. शिवणे आणि उत्तमनगर हा भाग मोठ्या लोकवस्तीचा असल्यामुळे येथे कचरा गोळा करण्यासाठी लागणारी वाहने आवश्यक होती ती आता उपलब्ध झाल्यामुळे रस्त्यावर कचरा साचने कमी होईल असे मत स्विकृत नगरसेवक सचिन दांगट यांनी यावेळी व्यक्त केले.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!