
शिवणे : अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या वर्षपूर्ती आनंदोत्सव सोहळ्याचे आयोजन सचिन विष्णु दांगट आणि हभप ममता सचिन दांगट यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम सोहळा शिवणे गावातील मारुती मंदिरासमोर मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमामध्ये सकाळी रामरक्षा पठण त्यानंतर गीत रामायण सुंदरकांड, राम सेतू शिल्प पूजन , सामूहिक श्रीराम आरती , महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ या सर्व धार्मिक कार्यक्रमाने श्रीराम मंदिर अयोध्या वर्षपूर्ती आनंदोत्सव लाडू वाटून मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.

यावेळी खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर, भाजप नेते अरुण दांगट, संतोष देशमुख, सुभाष नाणेकर, पै. योगेश धावडे, दिलीप कदम, सुभाष मोरे, हभप वसंत दांगट, यज्ञेश पाटील, राजू भोसले, सुरेंद्र यादव, निखिल दांगट, भगवान शिंदे, गौरव ढगारे त्याचप्रमाणे, शिवणे, उत्तमनगर, कोपरे, कोंढवे ग्रामस्थ तसेच बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सर्व पदाधिकारी व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन माजी स्विकृत नगरसेवक सचिन दांगट यांनी केले होते.