|

एकेके न्यू लॉ अकादमी मध्ये “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” कार्यक्रम

लोकनीती न्युज नेटवर्क
पुणे : एम.सी.ई. सोसायटीच्या ए.के.के. न्यू लॉ अकादमी येथे महाराष्ट्र सरकारच्या “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या अभिनव उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या वाचन-लेखन कौशल्याला चालना देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुस्तक प्रदर्शन, गट पुस्तक वाचन, कायदेशीर संशोधन आणि वाचन कौशल्य कार्यशाळा, निकाल विश्लेषण सादरीकरण, वाचन कौशल्यावरील लेखक भाषण आणि पुस्तक समीक्षा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.


एकेके न्यू लॉ अकादमीचे प्राचार्य डॉ. सलीम शेख यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले आणि कार्यक्रमाची संकल्पना सादर केली. बीए-एलएलबी, एलएलबी आणि एलएलएमच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने उपक्रम आणि स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. ए.के.के. न्यू लॉ अकादमी, पुणेच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. श्वेता गुप्ता यांनी वाचन कौशल्यवरील लेखक भाषणादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधला. निकाल विश्लेषण सादरीकरणाचे निर्णायक म्हणून डॉ. रेश्मा पांढरे, डॉ. भारती शेलके आणि डॉ. गीतांजली पायगुडे यांनी काम पाहिले.
कार्यक्रम महाविद्यालयाच्या वाचन संकल्प समितीने आयोजित केला होता ज्यामध्ये डॉ. सलीम शेख, डॉ. इंतखाब आलम सिद्दीकी, डॉ. श्वेता गुप्ता, डॉ. स्वाती शिंदे, डॉ. प्रीतम बट्टलवार आणि डॉ. जॅसिंटा बॅस्टियन यांचा समावेश होता.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!