
लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या नवीन कायद्यांच्या माहितीसाठी कोंढवे धावडे येथे कायदे विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस उपायुक्त संभाजी कदम तसेच सहाय्यक आयुक्त भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांनी कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी महिलांशी संबंधित कायदे तसेच लैंगिक अत्याचार या विषयावर माहिती देण्यात आली. नागरिकांचे कायदेशीर हक्क आणि जवाबदाऱ्या समजावून सांगणे, समाजात घडणारे गुन्हे, लैंगिक अत्याचार अंतर्गत कायदे यावर विस्तृत माहिती देण्यात आली.

उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमृता चवरे यांनी उपस्थितांना पॉक्सो कायद्याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाला उत्तमनगरचे माजी सरपंच सुरेश गुजर, माजी सरपंच सुभाष नाणेकर, राष्ट्रवादी पक्षाचे ग्रामीण अध्यक्ष त्रिंबक मोकाशी, माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, माजी सरपंच नितीन धावडे, संतोष शेलार, अविनाश सरोदे, दानिश अन्सारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीराम कुलकर्णी तसेच परिसरातील नागरीक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.