|

महिला दिनानिमित्त गुडविल तर्फे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

लोकनीती न्युज नेटवर्क

शिवणे : महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. अनिल दुधभाते यांच्या डॉ दूधभाते नेत्रालय व रेटिना सेंटर क्लिनिकतर्फे गुडविल मधील सुमारे ६० महिलांची नेत्र तपासणी करण्यात आली. याशिवाय महिलांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल समुपदेशन करण्यात आले.या शिबिरात महिलांना मोफत नेत्र तपासणीसोबतच डोळ्यांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांनी डोळ्यांच्या नियमित तपासणीचे महत्त्व समजावून सांगत योग्य आहार व जीवनशैलीसंदर्भात माहिती दिली. आरोग्याची काळजी घेण्याच्या गरजेवर प्रकाश टाकत अशा उपक्रमांचे कौतुक केले.शिबिरात अनेक महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

गरजू महिलांना आवश्यकतेनुसार मोफत चष्मे व औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले. संयोजकांनी सांगितले की, भविष्यातही अशा प्रकारचे आरोग्यविषयक उपक्रम राबवले जातील, जेणेकरून महिलांचे आरोग्य सुदृढ राहील. कार्यक्रमामध्ये क्लिनिक तर्फे डॉ रोहन चौगुले, सचिन सरवदे, अनुराग क्षीरसागर यांनी महिलांची नेत्र तपासणी केली. तर गुडविलतर्फे संपदा अलाटे, स्वाती पाटील, स्वप्नील माळी, महेश कुलकर्णी आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!