
लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : शिवणे येथील सर्वे नंबर ९७ मध्ये रस्ता आणि पावसाळी लाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. पुणे महानगर पालिकेच्या माध्यमातून माजी नगरसेवक सचिन दोडके यांच्या प्रयत्नांतून आणि अतुल दांगट यांच्या पाठपुराव्याने या कामासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सुरुवातीला ५० लाख रुपये खर्चून प्राथमिक टप्प्यातील काम हाती घेण्यात येणार आहे. भूमिपूजन समारंभाला स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी या प्रकल्पामुळे परिसरातील पायाभूत सुविधा सुधारण्यास मदत होईल, तसेच पावसाळ्यात होणाऱ्या पाणी तुंबण्याच्या समस्येवर तोडगा निघेल, असे मत व्यक्त करण्यात आले.

यापूर्वी येथील नागरिकांनी खराब रस्त्यांमुळे होत असलेल्या समस्यांबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या. अखेर प्रशासनाने याची दखल घेत या कामाला मंजुरी दिली. कामाच्या तातडीने सुरुवातीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यावेळी माजी उपसभापती शेखर दांगट, मा. नगरसेवक सचिन दोडके, जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष त्रिंबक मोकाशी, सुरेश गुजर, अतुल दांगट, दिलीप कदम, अतुल धावडे, विकास दांगट, आरोग्य निरीक्षक कौसर पटेल, महादेव भांडगे, संतोष देशमुख, विक्रम देशमुख, ऍडव्होकेट योगेश पाटील, फारुक शेख, सचिन देशमुख, राहुल दांगट, ललित दांगट आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.