|

कोंढवे धावडे येथे जिलानी मस्जिद आणि पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने इफ्तार पार्टीचे आयोजन

लोकनीती न्युज नेटवर्क

उत्तमनगर : कोंढवे धावडे येथील जिलानी मस्जिद आणि उत्तमनगर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात पोलिस अधिकारी व मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्तमनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकेश कुरेवाड, धनंजय बिटले तसेच इतर कर्मचारी यांनी उपस्थिती लावून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.

जिलानी मस्जिद तर्फे अय्युब कुरेशी, मुश्ताक शेख, जिशान कुरेशी, वसीम सय्यद, इब्राहिम शेख, इम्तियाज शेख, असलम पठाण तसेच अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलीस आणि स्थानिक समाज यांच्यातील सुसंवाद अधिक दृढ होण्यास मदत झाली. सहभोजनाच्या या मंगल प्रसंगी सर्वांनी एकत्र येऊन सौहार्दाचे दर्शन घडवले. पोलीस दल आणि समाजाच्या परस्पर सहकार्याने सामाजिक शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्याचा संदेशही या माध्यमातून देण्यात आला.

इतरांना शेअर करा

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!