|

जम्मू-काश्मीरमधील अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवण्यात जोरदार आंदोलन

लोकनीती न्युज नेटवर्क

उत्तमनगर : जम्मू कश्मीर पहेलगम येथे पर्यटनास गेलेल्या हिंदू बांधवांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा तिव्र निषेध शिवणेतील देशमुखवाडी येथे नागरीकांच्या वतीने करण्यात आला. यावेळी भारतमाता की जय अशा घोषणा देण्यात आल्या तसेच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना श्रद्धांजली अर्पण करीत संवेदना व्यक्त करण्यात आल्या. यावेळी उपस्थित नागरीकांनी कारवाई अशी करा की दहशतवादाच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील. दहशतवाद्यांना जशाच तसे उत्तर द्या अशा आशयाचे फलक हाती घेऊन पाकिस्तान व पाकिस्तान मधील अतिरेक्यांविरुद्ध तिव्र निषेध नोंदवत हिंदु बांधवांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना गोळ्या घालण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. या निषेध आंदोलनात स्विकृत सदस्य सचिन दांगट, हभप ममता सचिन दांगट, उमेश सरपाटील, सुभाष नाणेकर, संतोष देशमुख, रावसाहेब दांगट, संजय धिवार, राजू भोसले, भगवान शिंदे, गजानन वानखेडे, निखिल दांगट, दादा शिंदे, व परीसरातील नागरिक सहभागी होते.

इतरांना शेअर करा

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!