स्वराज्य फार्महाऊस येथे भव्य कार्यकर्ता चिंतन शिबीर व मेळावा संपन्न

लोकनीती न्युज मीडिया
पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहर कार्यकारिणीच्या वतीने सिंहगड किल्ल्याजवळील स्वराज्य फार्महाऊस येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोथरूड येथील जितेश दामोदरे यांची पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रभारी शैलेंद्र चव्हाण, तसेच महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे प्रमुख पदाधिकारी परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, आसितभाऊ गांगुर्डे, महेंद्र कांबळे, अशोक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

शहर कार्यकारिणीतून महिपाल वाघमारे, वसंत बनसोडे, श्याम सदाफुले, बसवराज गायकवाड यांसारख्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जितेश दामोदरे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या निवडीमुळे कोथरूड परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा आणि उत्साह संचारला असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.