|

यशवंतनगर सोसायटीत रंगांचा जल्लोष, होळी उत्साहात साजरी!

लोकनीती न्युज नेटवर्क

शिवणे : यशवंतनगर सोसायटीमध्ये होळी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. रहिवाशांनी पारंपरिक पद्धतीने होळी दहन करून वाईट प्रवृत्तींचा नाश करण्याचा संदेश दिला, तर धुलिवंदनाच्या दिवशी रंगांची उधळण करत सर्व वयोगटातील लोकांनी आनंद लुटला. सोसायटीमध्ये होळीचा सण विशेष उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षीही विविध सांस्कृतिक कार्यक्रम, गाणी, नृत्य यांचे आयोजन करण्यात आले होते.

सोसायटीचे अध्यक्ष सुनिल वरघुडे यांनी सांगितले की, होळी हा सण फक्त रंगांचा नाही, तर तो एकात्मतेचा आणि आनंदाचा संदेश देतो. आम्ही पर्यावरणपूरक रंग वापरावर भर देऊन ही होळी साजरी केली. धुलीवंदनाच्या दिवशी तरुणाईने डीजेच्या तालावर ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला. महिलांसाठी खास फाग गीतांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण सोसायटीने एकत्र येऊन सणाचा आनंद लुटला आणि बुरा ना मानो, होली है च्या गजरात रंगांची उधळण केली.

इतरांना शेअर करा

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!