
लोकनीती न्यूज मिडिया
पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने सारसबाग, पुणे येथे साजरी करण्यात आली. मातंग समाज सेवा ट्रस्ट, कोथरूड यांच्या वतीने आयोजित या भव्य कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाला भाजपा कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे, रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश नेते परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, दलित स्वयंसेवक संघाच्या लक्ष्मीताई पवार, भाजपाचे पुणे शहर नेते संदीप बुटाला, निलेश कोंढाळकर, भगीरथ नामा वृत्तपत्र समूहाचे संपादक दिपक सगर, आरपीआयचे वरिष्ठ उपाध्यक्ष जितेश दामोदरे, पत्रकार विशाल सरवदे तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा समितीचे अध्यक्ष विजय डाकले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी वक्त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत समाजात जागृती निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी ट्रस्ट व आयोजकांचे विशेष अभिनंदन केले.