|

पुण्यात पीएमपीएमएलच्या दरवाढीवर ‘आप’चा तीव्र विरोध

लोकनीती न्युज  

पुणे : पीएमपीएमएलने सार्वजनिक बससेवेच्या तिकिट दरात केलेल्या मोठ्या वाढीविरोधात आम आदमी पार्टी (आप) तर्फे स्वारगेट चौकामध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले. ही दरवाढ सामान्य पुणेकरांसाठी अन्यायकारक असून त्यामुळे प्रवाशांची संख्या घटेल, वाहतूक कोंडी वाढेल आणि प्रदूषणाचे प्रमाणही अधिक होईल असा इशारा आपतर्फे देण्यात आला. पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाने नुकताच निर्णय घेऊन किमान तिकीट दर ५ रुपयांवरून १० रुपये, दैनंदिन पास ४० रुपयांवरून ७० रुपये आणि मासिक पास ९०० रुपयांवरून तब्बल १५०० रुपयांपर्यंत वाढवला आहे. ही दरवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नसून त्यांच्या खिशावर मोठा भार टाकणारी आहे असे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात स्पष्ट केले. प्रशासनाने वार्षिक तूट भरून काढण्यासाठी आणि दर कीफायतशीर व सुलभ करण्याच्या उद्देशाने ही दरवाढ केल्याचे सांगितले असले, तरी त्यामुळे मुख्यतः रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना व सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. परिणामी लोक खाजगी वाहनांकडे वळतील आणि त्यामुळे वाहतूक कोंडी व प्रदूषण वाढणार आहे, असा ‘आप’चा आरोप आहे. दरवाढीऐवजी उत्पन्नाचे पर्यायी मार्ग शोधणे, मेट्रो एंड-माईल कनेक्टिव्हिटी मजबूत करणे, तसेच प्रशासनातील भ्रष्टाचार व अकार्यक्षमता दूर करणे, अधिक बसेस उपलब्ध करून देणे आदी उपाय करणे गरजेचे असल्याचे ‘आप’चे मत आहे. या दरवाढीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी प्रवासी संघटनांसह नागरिक व राजकीय पक्षांचे मत घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी आपने केली आहे. अन्यथा पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

इतरांना शेअर करा

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

All content, images, and materials published on Lokniti News are provided for general information and public awareness purposes only. While every effort is made to ensure accuracy and authenticity, Lokniti News does not make any warranties, express or implied, regarding the completeness, reliability, or accuracy of the information. All images, videos, and other media used on this website are either created by Lokniti News, used with permission, or believed to be in the public domain. If any copyrighted material has been used inadvertently, it is purely unintentional. The concerned copyright owner may contact us for correction or removal. Unauthorized use, reproduction, or distribution of any content from this website is strictly prohibited and may invite legal action under the Indian Copyright Act, 1957. By accessing this website, you agree that any disputes arising out of or related to its use shall be subject to the exclusive jurisdiction of the courts at Pune, Maharashtra, India. © 2025 Lokniti News. All Rights Reserved.

error: Content is protected !!