|

आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेमध्ये मराठी गौरव दिन साजरा.

लोकनीती न्युज नेटवर्क
कर्वेनगर : येथील आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेत मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून स्मिता देशपांडे उपस्थित होत्या.

जेष्ठ शिक्षिका छाया आबणावे यांनी प्रास्ताविक केले यानंतर विद्यार्थिनींनी मराठी दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. प्रमुख पाहुणे स्मिता देशपांडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिकेत जगदीश तिजारे यांनी केले.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!