
लोकनीती न्युज नेटवर्क
उत्तमनगर : खडकवासला मतदार संघातील कामगार आघाडीच्या उपाध्यक्षपदी अशोक आंधळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहर कामगार आघाडीचे अध्यक्ष ओंकार कदम यांच्या नेतृत्त्वाखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

अशोक आंधळे यांनी कामगार हितासाठी नेहमीच सक्रिय भूमिका घेतली असून, कामगारांच्या आर्थिक प्रश्नांवर आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा आपला निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीमुळे कामगार आघाडीला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.