
शिवणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त कोंढवे धावडे येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १२९ रकतदात्यांनी रक्तदान केले तसेच २०८ लोकांची रक्तगट तपासणी करण्यात आली. कालकथित सिंधुताई आदिनाथ लांडगे यांच्या स्मरणार्थ प्रत्येक रक्तदात्यास यानिमित्ताने हेल्मेट तसेच संविधानाची उद्देशिका व पुस्तके भेट देण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण करून व संविधानाचे पूजन करून करण्यात आली.

राष्ट्र सेवा समूहाचे अध्यक्ष राहुल पोकळे यांच्या हस्ते झेंडावंदन तर जि.प. सदस्य अनिता इंगळे यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थिती राहून उपक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन प्रविण लांडगे, प्रशांत लांडगे, महेश कुलकर्णी, विनोद वानखेडे, विशाल कडू, वैभव खाडिलकर, अक्षय पायगुडे, विजय जोशी, मनोज वानखडे, विनोद बावकर, अंकुश सावळे, सागर, राव, प्रशांत सोनवणे, अजय सिंग, मिलिंद कानिटकर, चंद्रशेखर मलखेडकर, प्रल्हाद मोकाशी, भाग्येश पायगुडे, हेमंत खरकवार, आर्यन लांडगे, यश जोशी,अमित देवकर, मंथन आंबेकर, विशेष रणखांबे, रमेश यादव, रितेश माळी यांनी केले होते.
