
लोकनीती न्युज नेटवर्क
खडकवासला : समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त धरण विसर्ग परिसरात भव्य स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. संत निरंकारी मिशनचे २०० स्वयंसेवक व वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने खडकवासला धरण विसर्ग परिसरातून तब्बल ६ टन कचरा गोळा करण्यात आला. स्वच्छता अभियानात अनेक स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. परिसरातील प्लास्टिक, काचेच्या बाटल्या, थर्माकोल, तसेच अन्य घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. या उपक्रमाद्वारे “स्वच्छ पर्यावरण, सुंदर भविष्यासाठी” हा संदेश देण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत गाडगेबाबांच्या स्वच्छता विचारांचे महत्त्व अधोरेखित केले आणि भविष्यात असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी सहायक आयुक्त दिपक राऊत, ब्रँड ॲम्बेसीडर रुपाली मगर, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक गणेश खिरीड, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक नितीन लोखंडे, आरोग्य निरीक्षक सचिन सावंत, दत्तात्रय दळवी, राजेश वैराट, कौसर पटेल, मोकादम व सेवक यामध्ये सहभागी झाले आहे.