13 Mar, 2025 | 6:30 PM

“शिवणे-उत्तमनगर परिसरात स्वच्छतेचा जागर”

लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत दि.१४ फेब्रुवारी रोजी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशा राऊत, महापालिका सहाय्यक आयुक्त दिपक राऊत, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक गणेश खिरिड, नितीन लोखंडे यांच्या मार्गदर्शनानुसार स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ च्या अनुषंगाने पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक ४२ शिवणे येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले व स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.

यावेळी संपूर्ण परिसरातून अंदाजे ९९५ किलो सुका कचरा व ३५० किलो ओला कचरा जमा करण्यात आला. यावेळी आरोग्य निरीक्षक कौसर पटेल, राजेंद्र वैराट, मोकादम महादेव भंडगे, अक्षय लांडगे, सामाजिक कार्यकर्ते अशोक आंधळे तसेच शिवणे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे, कोपरे कोठीचे सफाई सेवक मोठया संख्येने उपस्थित होते.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!