
लोकनीती न्यूज मीडिया
पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) श्रमिक ब्रिगेड पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्षपदी दीपक सगर यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. सतीश केदारी यांच्या हस्ते करण्यात आली.या निवडमोर्चाचे नेतृत्व सुभाष सहजराव (सचिव, महाराष्ट्र प्रदेश) यांनी केले.

यावेळी निलेश आगळे (संघटक सचिव, महाराष्ट्र प्रदेश), अंकुश सोनवणे (सचिव, पश्चिम महाराष्ट्र), किशोर पंडागळे (अध्यक्ष, पुणे शहर), विशाल ओव्हाळ (कार्याध्यक्ष, पुणे शहर), लक्ष्मी कांबळे (कार्याध्यक्ष, पुणे शहर महिला आघाडी), गंगाधर ओव्हाळ (अध्यक्ष, कोथरूड मतदार संघ), बाबासाहेब राऊत आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या निवडीमुळे दीपक सगर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.