|

शिवजयंती दिवशी ‘ड्राय डे’ घोषित करण्याची मागणी

लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला राज्यभर ‘ड्राय डे’ घोषित करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रविण लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
शिवजयंती हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा दिवस असून या दिवशी विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक शिवप्रेमी किल्ल्यांची स्वच्छता, रक्तदान शिबिरे आणि समाजोपयोगी उपक्रम राबवतात. सार्वजनिक उत्सव साजरे करण्यासाठी रात्री १० वाजेपर्यंत वेळ दिली जाते परंतु गणेशोत्सवामध्ये काही दिवस वेळ वाढवली जाते याच पार्श्वभूमीवर शिवजयंती दिवशी देखील वेळ वाढवून १२ वाजेपर्यंत करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या दिवशी मद्यविक्री बंद ठेवण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की गांधी जयंती, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन यांसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवशी ‘ड्राय डे’ असतो, तसेच शिवजयंतीचाही यामध्ये समावेश करावा. छत्रपती शिवाजी महाराज हे नीती, शिस्त आणि आदर्श नेतृत्वाचे प्रतीक होते. त्यांच्या जयंतीला सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन किंवा मद्यविक्रीस आळा घालणे आवश्यक आहे, असे मत मागणीद्वारे व्यक्त करण्यात आले आहे.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!