|

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

लोकनिती न्युज नेटवर्क

शिवणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त समर्थ युवा फाऊंडेशन व महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. तसेच मानवता सामाजिक सेवा संस्था, शिवभिम सामाजीक सेवा संस्था, मातृभुमी सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वारजे वाहतुक शाखे जवळ मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा शंभरहून अधिक नागरीकांनी लाभ घेतला. यामध्ये स्तनांचा कॅन्सर, रक्त तपासणी, मधुमेह, छातीचा एक्सरे आदी विविध तपासण्यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे आयोजन दिपक बलाढे, चंद्रकांत कांबळे, रियाज शेख, अश्विन ढगे, किशोर म्हस्के, दत्ता भालेराव, लक्ष्मण जाधव यांनी केले होते. यावेळी माजी उपमहापौर दिलीप बराटे, माजी नगरसेवक प्रदीप धुमाळ, माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, माजी नगरसेवीका सायली वांजळे-शिंदे, संजय दोडके, वाहतुक पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ, विनायक लांबे, दत्ता पाकीरे, निलेश वांजळे, जगन्नाथ चौधरी, बुकेश गायकवाड, विलास कांबळे, राजीव पाटील, अभिमन्यू तिखे, नाना ओव्हाळ, गुणवंत घोडके, बालाजी पवार, ललीत इंगळे, फरीदा इनामदार आदी उपस्थित होते.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!