|

शिवणे परिसरात सोसायटी महासंघाची स्थापना

लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे – शिवणे, उत्तमनगर, कोपरे, कोंढवे धावडे परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या एकत्रित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आणि रहिवाशांच्या हितासाठी सोसायटी महासंघाची स्थापना करण्यात आली आहे. या महासंघाच्या माध्यमातून परिसरातील पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, सुरक्षा, रस्त्यांची दुरवस्था, पार्किंगच्या समस्या आदी विषयांवर एकत्रितपणे काम केले जाणार आहे. महासंघाच्या उद्घाटन सोहळ्यास अनेक सोसायट्यांचे अध्यक्ष, सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी महासंघाच्या अध्यक्षपदी नवनाथ नलावडे यांची निवड करण्यात आली, उपाध्यक्ष पदी राकेश सर्जेराव तर सचिवपदाची जबाबदारी प्रविण लांडगे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
या प्रसंगी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे, कोपरे परिसर झपाट्याने विकसित होत आहे. मात्र, अनेक सोसायट्यांना समान समस्या भेडसावत आहेत. त्या सोडवण्यासाठी हा महासंघ महत्त्वाची भूमिका बजावेल.
परिसरातील सोसायटी मधील सर्व नागरिकांनी या महासंघाच्या स्थापनेचे स्वागत केले असून, भविष्यात सर्व सोसायट्यांना एकत्र आणून प्रशासनासोबत समन्वय साधण्याचा महासंघाचा मानस आहे.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!