
लोकनीती न्युज नेटवर्क
कोथरूड : परीक्षा फक्त ज्ञानाची कसोटी नसून आत्मविश्वास, मानसिक स्थैर्य आणि योग्य नियोजनाचीही परीक्षा असते या विचारातूनच कडक मिसळ, श्री साई एज्युकेशन ट्रस्ट, मातोश्री भेळ आणि मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “परीक्षेला सामोरे जाताना” या चर्चासत्राला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील यशासाठी प्रभावी तयारी, तणावमुक्त अभ्यास पद्धती, वेळेचे नियोजन आणि मानसिक संतुलन याविषयी तज्ज्ञांनी मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी यशस्वी रणनीती, आत्मविश्वास वाढवण्याची तंत्रे आणि तणावमुक्त अभ्यास करण्याचे विविध उपाय शिकता आले. विशेषतः स्वतःवरील विश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि नियमित सराव यावर भर देण्यात आला. यावेळी प्रा. सागर शेडगे, प्रा. श्रीकांत मोहोळ, प्रा. मनोज उल्हे, प्रा. अमृता देशपांडे ह्या तज्ज्ञांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाला सोपान वांजळे, गिरीश खत्री, अनंता (बाप्पू) सुतार, हरपुडे मामा, पल्लवी समीर गाडगीळ, अल्पना गणेश वर्पे, आरती तेंडले, केतन तेंडले, संतोष उभे आदी मान्यवर उपस्थित होते.

या चर्चासत्राचे यशस्वी आयोजन योगेश पवार, मधुरा पवार, कोमल केळकर, महेश केळकर, लोकेश जैन, स्वप्निल राजपूत, विशाल गांगरकर, नागेश टकले, दत्ता निबुदे यांनी महत्त्वाचे योगदान दिले. कार्यक्रमाची प्रस्तावना योगेश पवार, सूत्रसंचालन कडू तर आभार प्रदर्शन स्वप्निल राजपूत यांनी मानले.
आयोजकांनी उपस्थित विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शकांचे आभार मानत, भविष्यातही असेच उपयुक्त आणि प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात येतील असे सांगितले. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा ताण कमी करत, परीक्षेचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या अशा उपक्रमांचे सतत आयोजन होणे गरजेचे आहे, तसेच कडक मिसळ आणि मातोश्री भेळ आणि मित्र परिवार यांनी मुलांसाठी घेतलेला कार्यक्रम स्तुत्य होता, असे कार्यक्रम होणे ही काळाजी गरज आहे अशी भावना यावेळी उपस्थित पालकांनी व्यक्त केली.