
लोकनीती न्युज
कोंढवे धावडे : अतुलअप्पा धावडे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि शाओलिन मार्शल आर्ट कराटे अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मोफत कराटे शिबिराचा समारोप सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण व शिवगर्जनेने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी लाठी, काठी, कराटे व बॉक्सिंगचे प्रात्यक्षिक सादर केली. पालक आणि मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक केले. या प्रसंगी अतुल अप्पा धावडे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘जनता – द पीपल’ या लेख संचाने सन्मान करण्यात आला.

प्रशिक्षण शिबिरामध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ व टी-शर्ट देऊन गौरवण्यात आले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमात अनेक मान्यवर, प्रशिक्षक व पालक वर्ग उपस्थित होता. शेवटी राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.