|

शिवणेतील कचऱ्याचे ढीग, स्वच्छता कर्मचारी आणि पालिकेच्या दुर्लक्षामुळे परिसरात अस्वच्छता आणि आरोग्य धोक्यात..

लोकनिती न्युज नेटवर्क

शिवणे : शिवणे, उत्तमनगर महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढीग साचले आहेत. लोकवस्तीतील दैनंदिन कचरा न उचलल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. तसेच परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे, या अस्वच्छतेमुळे विविध आजाराचे प्रमाणदेखील वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परिसरात अनेक ठिकाणी दैनंदिन कचरा उचलण्यास कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याचे दिसत आहे; तर कचरा उचलल्यानंतर जंतुनाशक औषधे आणि पावडरची फवारणी केली जात नाही.
स्वच्छता कर्मचारी सर्व ठिकाणचा कचरा नियमित उचलतात की नाही, यासाठी ठेकेदाराकडून पाहणी केली जाते की नाही असा प्रश्न विचारला जात आहे. कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आणि काम चुकारपणामुळे कचऱ्याचे ढीग जमा होत आहेत त्यांच्यावर दंडनीय कारवाई केली जात नाही त्याचे परिणाम स्थानिक नागरिकांना भोगावे लागत आहेत. नव्याने समाविष्ट गावांतील नागरिकांकडून कचरा जमा करण्यासाठी पालिकेने ठेकेदारास घंटागाड्या दिल्या आहेत. परंतु घंटा गाड्या बऱ्याच ठिकाणी पोहोचतच नसल्यामुळे नागरीक जमा झालेला कचरा रस्त्यांवर आणून टाकत आहेत ज्यामुळे शिवणे गावात जागोजागी कचऱ्याचे ढीग लागून परिसराचे विद्रुपीकरण होत आहे. मोरे पेट्रोल पंपसमोर, देशमुखनगर आणि शिंदे पूल ह्या ठिकाणी नागरीक मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असल्यामुळे कचऱ्याचे लांबच लांब ढीग नेहमीच दिसत आहेत. कचरा पडू नये यासाठी मनपा प्रशासनाच्या वतीने कोणतीही उपाय योजना केली जात असल्याचे दिसत नाही.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!