
लोकनीती न्युज नेटवर्क
वारजे : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वारजे चौकात ऐतिहासिक नाणी व शस्त्र प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन वारजे विभाग संघचालक चितरंजन भागवत आणि खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला मा. नगरसेवक बाबा धुमाळ, मा. नगरसेवक किरण बारटक्के, मा. नगरसेवक सचिन दांगट, मा. नगरसेवक विकास नाना दांगट, अभिनेते सुरेश विश्वकर्मा, कैलास दांगट, भारतभूषण बराटे, दत्ता झंजे, सचिन अण्णा बराटे, संजय बराटे, अरुण दांगट, मा. सरपंच नितीन धावडे, अनिता देवकर, अमर बराटे तसेच मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राजीव पाटील सोशल अँड चॅरिटेबल फाउंडेशन आणि स्वप्नील गोगावले यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत पंडित यांनी केले.

या प्रदर्शनात छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडाशी संबंधित दुर्मिळ नाणी, ऐतिहासिक शस्त्रे आणि वस्तूंचे दर्शन नागरिकांना घडविण्यात आले. शिवकालीन तलवारी, वाघ नख्या, तोफगोळे, चिलखत अशा अनेक दुर्मिळ वस्तू यावेळी प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. उपस्थितांनी प्रदर्शनाचे कौतुक करत आयोजकांचे विशेष आभार मानले.