|

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १२८ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

लोकनीती न्युज नेटवर्क

पुणे: समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२८ व्या स्मृतिदिनानिमित्त माळी महासंघ पुणे शहर यांच्या वतीने समता भूमी येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले, अध्यक्ष दीपक जगताप, बाळासाहेब लडकत, गिरीष झगडे, राजेंद्र लडकत, रवी सहाणे, प्रज्वल बनकर, आकाश दहीवडे, अनंता रासकर, तेजा भास्कर, दत्ता घारमळकर, रिमा लडकत, शारदात फरांदे, प्रीती म्हेत्रे, आरती सहाणे, तनुजा जाधव तसेच माळी महासंघ पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांची महत्त्वपूर्ण जाणीव या कार्यक्रमातून उपस्थितांना झाली. समाजसुधारणेच्या या कार्यातून प्रेरणा घेत, त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!