|

नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष – मनसेचा आक्रमक पवित्रा

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाला “हार” घालून अनोखा निषेध

लोकनीती न्युज नेटवर्क
पुणे : भवानी पेठ परिसरातील नागरिकांच्या समस्या सातत्याने दुर्लक्षित केल्या जात असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाच्या उदासीनतेला लक्ष्य करत, मनसे कार्यकर्त्यांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाला “हार” घालून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. स्थानिक नागरिकांना पाणीपुरवठा, रस्त्यांची दुर्दशा, कचऱ्याची समस्या आणि मूलभूत सुविधा मिळण्यात अडचणी येत आहेत. या तक्रारी वारंवार करूनही महापालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप मनसेने केला. प्रभाग क्रमांक १८ मधील विविध समस्या मांडण्यासाठी मनसेचे पदाधिकारी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय येथे गेले असता दुपारी ४ वाजले तरी संबंधित क्षेत्रीय अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांच्या दालनास हार घालत निषेध व्यक्त केला.

गोविंद हलवाई चौक ते मोमीन पुरा या ठिकाणी टाकण्यात आलेल्या ड्रेनेज लाईनला मागच्या वर्षीच्या बजेट मध्ये तरतूद करण्यात आली होती सदर कामाला या वर्षीही बजेट देण्यात आले आहे या ठिकाणी ४५० मिमी व्यासाची ड्रेनेज लाईन टाकण्यात आली आहे आणि त्याच ठिकाणी कसबा विधानसभेचे आमदार यांचा ९०० मिमी व्यासाच्या मलवाहिनी बदलणे अशा आशयाचा बॅनर (फ्लेक्स) लावण्यात आला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. या निषेधाच्या वेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाला इशारा दिला की, जर त्वरित कारवाई झाली नाही, तर अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल. या आंदोलनामुळे स्थानिक प्रशासनाला नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहावे लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी मनसेचे वसंत खुटवड, रवि सहाणे, संग्राम तळेकर, प्रवीण क्षीरसागर, प्रज्वल अडागळे, गणेश धुमाळ आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

तत्पूर्वी दुपारी १ वाजता सर्व कामकाज ठप्प करून कसबा मतदार संघातील भाजपा कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली सदर बैठकीचे आयोजन क्षेत्रीय अधिकारी किसन दगडखैर यांनी केले होते हि बाब अतिशय चुकीची असून या बाबत निषेध व्यक्त करून भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय हे राजकीय कार्यालय आहे कि शासकीय कार्यालय आहे असा प्रश्न मनसेच्या वतीने विचारण्यात आला आहे.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!