|

नरवीर तानाजी मालुसरेंना भारतीय नौदलाची मानवंदना

लोकनीती न्युज नेटवर्क
खडकवासला – मराठा साम्राज्याचे शूर सेनानी नरवीर तानाजी मालुसरे यांना भारतीय नौदलाकडून ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर मानवंदना देण्यात आली. नौदलाच्या ‘आयएनएस तानाजी’ केंद्राचे पथकातील ५ अधिकारी आणि २५ जवान या विशेष मोहिमेत सहभागी झाले होते. भारतीय नौदलाच्या या सोहळ्यात तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाला वंदन करण्यात आले. सिंहगडाच्या लढाईत गड जिंकून देणाऱ्या तानाजींच्या त्यागाला आणि शौर्याला सलाम करण्यासाठी नौदलाने हा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी नौदलाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पराक्रमाचे स्मरण करत स्वातंत्र्य आणि सागरी सुरक्षेसाठी प्रेरणा घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

मराठा इतिहासाच्या सोनेरी पानांपैकी एक असलेल्या सिंहगडावर भारतीय नौदलाने दिलेली ही मानवंदना, शौर्य आणि त्यागाच्या वारशाला उजाळा देणारी ठरली. नरवीर तानाजी यांच्या स्मृतिस्थळावर कॅप्टन दर्शनकुमार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अनिता इंगळे, माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे, समीर जाधवराव तसेच परिसरातील रहिवाशांच्या वतीने नौदलाच्या अधिकारी आणि जवानांचा सन्मान करून स्वागत करण्यात आले. नौदलाच्या वतीने प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर तानाजी मालुसरे यांना मानवंदना देण्यासाठी ही मोहीम आयोजित करण्यात आली होती.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!