
लोकनिती न्युज नेटवर्क
शिवणे : एनडीए रोड वरील न्यू अहिरे गाव ते कै.नवनाथभाऊ दांगट चौक, शिवणे या मुख्य रस्त्यावर असलेल्या कै.आ. रमेश वांजळे जॉगिंग ट्रॅक वरील बहुतांश झाडे पाणी न मिळाल्यामुळे तसेच त्याची निगा न राखल्यामुळे वाळून गेली आहेत. पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने लावलेली ही झाडे वाळल्यामुळे या ट्रॅक वरती येणाऱ्या जाणाऱ्या स्थानिक नागरिकांनी पुणे महानगरपालिकेच्या या गलथान कारभाराच्या विरोधात नाराजी दर्शवली आहे. या जॉगिंग ट्रॅकच्या शेजारी असणाऱ्या काटेरी झुडपांच्या फांद्या तोडण्यासाठी आणि आठवड्यातून दोन वेळा झाडांना पाणी देण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने शहर उपाध्यक्ष निलेश वांजळे यांनी मनपा गार्डन विभागाकडे केली.आहे.