|

कोंढवा गेट ते आळंदी बस मार्गाचा शुभारंभ ; वारकऱ्यांसाठी दिलासा

लोकनीती न्युज नेटवर्क 

उत्तमनगर : कोंढवे गेट ते आळंदी या बस मार्गाचा शुभारंभ कीर्तनकार ह.भ.प. सुधाकर महाराज कांडेकर आणि हरिभक्त पारायण संदिप महाराज गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला. शिवणे, उत्तमनगर, कोपरे, कोंढवे या भागांमध्ये वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर असून आषाढी वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत असतात. या बस सेवेचा त्यांना मोठा लाभ होणार आहे. ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी उत्तमनगरचे माजी सरपंच सुभाष नाणेकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अतुल दांगट यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारामुळे या भागातील भाविकांना थेट आळंदीपर्यंत प्रवास सुलभ होणार आहे. या वेळी पीएमपीएल चे कोथरूड डेपो व्यवस्थापक सुरेंद्र दांगट, वाहक गणेश पोपळे आणि चालक दिगंबर लवटे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ह.भ.प. गिरी गोसावी महाराज, ह.भ.प. दत्तात्रय तोंडे महाराज, ह.भ.प. संतोष पवार महाराज, ह.भ.प. सुभाष शेठे महाराज, जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, राष्ट्रवादी ग्रामीण अध्यक्ष त्रिंबक मोकाशी, सुरेंद्र कामठे, भाऊ दांगट, कैलास नाणेकर, बाळासाहेब मांजरे, गुलाब जाधव यांच्यासह पंचक्रोशीतील वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतरांना शेअर करा

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!