
लोकनीती न्युज नेटवर्क
वारजे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व संस्कार मंदिर संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय वारजे माळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हवेली तालुक्यातील मांडवी बुद्रुक येथे युथ फॉर माय भारत अँड युथ फॉर डिजिटल लिटरसी या थीमवर आधारित हिवाळी श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न झाले. राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बराटे यांच्या हस्ते व प्राचार्य डॉ. धनंजय त्रिमुखे, डॉ. राजेंद्र थोरात, सरपंच सचिन पायगुडे आणि संदीप महाराज गोगावले, संस्थेचे खजिनदार अविनाश जाधव, संस्थेचे सहसचिव अभ्युदय बराटे, संतोष बराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सात दिवसीय शिबिरात मांडवी बुद्रुक या गावाच्या विकासाच्या दृष्टीने, स्वच्छ भारत ग्राम स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, डिजिटल साक्षरता, भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव, एकपात्री नाट्य प्रयोग तसेच हजारो गावकऱ्यांच्या उपस्थितीत कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. डॉ स्वप्निल गायकवाड व प्रा. अभिजीत परसे यांनी शिबिराचे यशस्वी संयोजन केले.

भारतीय संविधानातील विचार हा संतांच्या अमृतवाणीतून आलेला आहे असे संदीप बर्वे यांनी विचार मांडताना सांगितले. डिजिटल साक्षरता आणि आजचा युवा, लोकसंख्येची घनता, भातृभाव व भगिनी भाव आणि लैंगिकता, भारत आर्थिक साक्षरता आणि त्यातील धोके अशा विषयांवर कॉम्रेड दीपक पाटील यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. दीपक शिंदे यांनी केले तर आभार डॉ. रायसिंग पाटील यांनी मानले पाहुण्यांचा परिचय डाॅ. प्राजंली विद्यासागर यांनी करून दिला.