|

वारजे हायवे चौकातील जीवघेणा खड्डा – प्रशासन झोपेत?

लोकनीती न्युज नेटवर्क
वारजे : वारजे हायवे चौकातील सिग्नलजवळ मोठा खड्डा पडला आहे, ज्यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. घाईगडबडीत जाणाऱ्या वाहनचालकांसाठी हा खड्डा अपघाताला निमंत्रण देत आहे. चार दिवस होऊन देखील खड्डा बुजवण्यात आलेला नाही उलट खड्ड्यामध्ये कोणी वाहनचालक पडू नये म्हणून नागरिकांनीच एक लाकूड अडकवले आहे जेणेकरून वेगाने येणाऱ्या वाहनांना खड्डा असल्याचे दिसू शकेल आणि होणारे अपघात टाळता येतील.

खड्डा पडून इतके दिवस झाले असताना देखील प्रशासन मात्र डोळे झाकून बसले आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे. वाहनचालक आणि नागरिकांचे जीव धोक्यात टाकणाऱ्या या खड्ड्याकडे लक्ष द्यायला प्रशासनाला अजून किती दिवस लागणार आहे असा प्रश्न नागरीक विचारत आहेत. ह्या चौकातून दिवसभरात हजारो वाहने ये जा करत असतात तसेच खड्डा मुख्य रस्त्यावर सिग्नलला लागून असल्यामुळे सिग्नल बंद होण्यापूर्वी वेगाने जाणाऱ्या वाहनचालकांसाठी धोक्याचा ठरू शकतो. प्रशासनाने त्वरित कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी अनेक वाहनचालकांनी व्यक्त केले.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!