
लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : शिवणे येथील देशपांडे अकॅडमीमध्ये लिटील माईंड्स फोनिक्स क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ऑनलाईन झालेल्या अबॅकसच्या नॅशनल लेव्हल स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले. या स्पर्धेत राज्यस्तरीय दुसरा क्रमांक आर्या चव्हाण हिने, तर तिसरा क्रमांक काव्या कनोजिया हिने पटकावला. तसेच इतर विद्यार्थ्यांनी मेरिट लिस्टमध्ये स्थान मिळवल्याने त्यांचा देखील सन्मानचिन्ह, पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्यास देशपांडे अकॅडमीचे संस्थापक शाम लोले, योगेश देशपांडे आणि मधुमती लोले उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका शुभांगी घोडराव यांना “उत्कृष्ट शिक्षिका” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळाली असून, त्यांचे कौशल्य अधिक विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मान्यवरांनी मत व्यक्त केले.