
लोकनीती न्युज नेटवर्क
पुणे : जागतिक मराठी भाषा गौरव दिवस आणि कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त रवी सहाणे आणि आरती सहाणे यांच्या वतीने मी मराठी माझी अभिजात मराठी स्वाक्षरी हा उपक्रम साजरा करण्यात आला. स प महाविद्यालयाजवळ टिळक रस्त्यावर मराठी स्फूर्ती गीतांच्या गजरात हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. लहान मुलांपासून जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी आपले मराठी भाषेवर प्रेम व्यक्त करत मराठी मध्ये स्वाक्षरी केली. उभारण्यात आलेल्या भव्य फलकावर जवळपास तीन हजार लोकांनी मराठी स्वाक्षरी केली. यावेळी आयोजक रवि सहाणे म्हणाले नागरिकांमध्ये मराठी भाषेची गोडी वाढावी, मराठी भाषा रोजच्या व्यवहारात यावी आणि यातून मराठी अस्मिता वाढावी यासाठी गेले १६ वर्ष आम्ही प्रयत्न करत आहोत.

याप्रसंगी मनसेचे नेते बाबू वागस्कर, बाळासाहेब शेडगे, गणेश सातपुते, किशोर शिंदे, रणजित शिरोळे, हेमंत संभूस, अजय शिंदे, साईनाथ बाबर, नरेंद्र तांबोळी, प्रल्हाद गवळी, योगेश खैरे, संतोष पाटील, वनिता वागस्कर, सुशीला नेटके, जयश्री पाथरकर , माई तळेकर, नीता पालवे, आशिष साबळे, प्रशांत कनोजिया, धनंजय दळवी, गणेश भोकरे, निलेश हांडे, राकेश क्षीरसागर, वसंत खुटवड, सारंग सराफ, अभिषेक थिटे, संग्राम तळेकर, शंकर भोसले, समीर पालवे, अजय राजवाडे, आशुतोष माने, शंतनू उभे, आनंद कुंदूर, हृषीकेश करंदीकर, प्रवीण क्षीरसागर, तेजस माने, आकाश सुरे, सागर कारंडे, अमित चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.