|

“पुण्यात प्रतिष्ठेच्या ‘मिस्टर पुणे’ स्पर्धेचा थरार ७ मार्चला रंगणार!”

लोकनीती न्युज नेटवर्क

वारजे : शहरातील बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेची मानली जाणारी ‘मिस्टर पुणे’ स्पर्धा यंदा ७ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये पुण्यातील नामांकित बॉडी बिल्डर्सना आपल्या ताकदीची चुणूक दाखवण्याची संधी मिळणार आहे. फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स व पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना, पिंपरी चिंचवड शरीरसौष्ठव संघटना यांच्या सहकार्याने व ट्रू व्हिजन (True Vision) यांच्या प्रमुख प्रायोजकत्वाने पुण्याची प्रतिष्ठेची समजली जाणारी व वर्षभर ज्या स्पर्धेची आतुरतेने खेळाडू वाट पाहतात अशी मिस्टर पुणे हि स्पर्धा शुक्रवार दिनांक ७ मार्च रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेट येथे आयोजीत केली आहे.

हि स्पर्धा महिला व पुरुष शरीरसौष्ठव तसेच वय वर्ष ४० व ५० वर्षावरील खेळाडूंसाठी मास्टर आणि मेन्स फिजिक अशा १२ गटात होणार आहे. स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे पुणे जिल्हयाचे नाव या खेळाच्या माध्यमातुन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाणाऱ्या खेळाडूंच्या नावाने प्रत्येक गट त्या खेळाडूला समर्पित करण्यात येणार आहे. अशा पद्धतीची संकल्पना या खेळात पहिल्यांदाच होत आहे. या स्पर्धेत २५० हून अधिक स्पर्धक सहभागी होतील त्यांच्या साठी रोख रक्कम, मानचिन्ह व प्रशतीपत्रक अशा स्वरुपाची अंदाजे ३५००००/- रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेची वजन, वय, उंची तपासणी त्याचदिवशी सकाळी १० ते १ या वेळेत तर स्पर्धा ४ ते १० वेळेत संपन्न होईल अशी माहिती फेडरेशनचे सचिव दिलीप धुमाळ यांनी दिली.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!