
लोकनीती न्युज नेटवर्क
पुणे – एम.सी.ई. सोसायटीच्या ए.के.के. न्यू लॉ अकादमी, पुणे यांच्या वतीने “डॉ. पी.ए. इनामदार अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या हक्कांवर राष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धा, २०२५” चे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा २१ ते २३ मार्च २०२५ दरम्यान हायब्रिड पद्धतीने पार पडली. कायद्याच्या विद्यार्थ्यांना त्यांचे वकिली कौशल्य विकसित करण्यासाठी आणि व्यावहारिक ज्ञान मिळविण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात प्रा. डॉ. इंद्रजित दुबे, कुलगुरू, राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, मेघालय हे प्रमुख पाहुणे होते, तर अध्यक्षीय स्थान प्रा. मुझफ्फर शेख, अध्यक्ष, सी.डी.सी., ए.के.के. न्यू लॉ अकादमी यांनी भूषवले. प्रा. इरफान शेख, सचिव, एम.सी.ई. सोसायटी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सलीम एम. शेख यांनी उपस्थितांचे स्वागत केले.या स्पर्धेत संपूर्ण भारतातील २४ संघांनी सहभाग घेतला. विविध फेऱ्यांमध्ये कसून चाचणी घेतल्यानंतर अंतिम फेरीत प्रवेश मिळविणाऱ्या संघांनी उत्कृष्ट युक्तिवाद सादर केले.समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ २३ मार्च २०२५ रोजी संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय न्यायमूर्ती डॉ. शालिनी फणसाळकर जोशी, माजी न्यायाधीश, मुंबई होत्या, तर अध्यक्षपद श्रीमती आबेदा पी. इनामदार, अध्यक्षा, एम.एम.ई. आणि आर.सी., उपाध्यक्ष, एम.सी.ई. सोसायटी, पुणे यांनी भूषवले. अॅड. डॉ. श्रीकांत मालेगावकर आणि प्रा. डॉ. हरुनरशीद कादरी हे देखील मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते.या स्पर्धेचे विजेतेपद शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज, पुणे यांनी पटकावले, तर युआयएलएस, चंदीगड उपविजेता ठरले.सर्वोत्कृष्ट वक्ता (प्रथम) – नितीन पुरुषोत्तम, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणेसर्वोत्कृष्ट वक्ता (द्वितीय) – निधी नायकवाड, एमआयटी डब्ल्यूपीयू स्कूल ऑफ लॉ, पुणेसर्वोत्कृष्ट मेमोरीअल (प्रथम) – उत्तरांचल विद्यापीठ, डेहराडूनसर्वोत्कृष्ट मेमोरीअल (द्वितीय) – नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ अॅडव्हान्स्ड लीगल स्टडीज, कोचीसर्वोत्कृष्ट संशोधक – संजीत पॉल, एसएनबीपी कॉलेज, पुणेस्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्य समन्वयक अॅड. इफ्तेखार पी. इनामदार, समन्वयक डॉ. जॅसिंटा एस. बास्टियन, उपप्राचार्य डॉ. अतुल झरकर आणि सहसमन्वयक डॉ. मनीषा अग्रवाल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या स्पर्धेने कायद्याच्या विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळवून देण्यास मदत केली असून, भविष्यातील वकिलांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.