
लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : सुरक्षा फाऊंडेशन आणि आसरा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एकेके न्यु लॉ अकादमीने महिलांवरील घरगुती अत्याचार यांवर शिबिर तसेच जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निवृत्त सरकारी वकील सईदा यासीन शेख, सुधीर शिंदे, कौटुंबिक न्यायालयाच्या अध्यक्ष ऍड. उज्ज्वला जाधव, एकेके लॉ.कॉलेज चे प्राचार्य डॉ सलीम शेख, प्रो. प्रशांत चव्हाण, आणि आरती जाधव हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे निमंत्रक सुरक्षा फाउंडेशन चे अध्यक्ष इम्तियाज मोमीन हे होते तर आयोजन फिरोझ तांबोळी, अमन इनायत शेख आणि शेर अली शेख यांनी केले होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती असल्याचे दिसून आले.
