|

शिवणे येथील देशपांडे अकॅडमीच्या वतीने सायन्स स्पर्धा व प्रदर्शनीचे आयोजन.

लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : शिवणे इंगळे कॉलनी येथील देशपांडे अकॅडमीच्या वतीने विज्ञान स्पर्धा आणि प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित कल्पक प्रकल्प सादर केले. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, नवकल्पना, रोबोटिक्स, ऊर्जा संवर्धन आणि भविष्यातील विज्ञान यासारख्या विषयांवर प्रकल्प सादर केले. स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्याला रोख ३ हजार रुपये आणि मानचिन्ह देण्यात आले तसेच दुसऱ्या विजेत्याला २ हजार रुपये आणि मानचिन्ह तर तिसऱ्या क्रमांकासाठी १ हजार रुपये आणि मानचिन्ह देण्यात आले. प्रदर्शनाला पालक, शिक्षक आणि विज्ञानप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करत विज्ञानाच्या वाटचालीत त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. देशपांडे अकॅडमीच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होईल, असे मत आयोजकांनी व्यक्त केले.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!