|

अंजनी नॅशनल प्री-स्कूलमध्ये क्रीडा दिनाचे आयोजन; चिमुकल्यांच्या कला आणि कौशल्यांना वाव

लोकनिती न्युज नेटवर्क

शिवणे : कोंढवे धावडे येथील अंजनी नॅशनल प्री स्कूल मध्ये क्रीडा दिन आयोजित करण्यात आला होता. यामध्ये लहान चिमुकल्यांसाठी धावणे, उंच उडी अशा प्रकारचे मातीचे खेळ तसेच चित्रकला सारख्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांच्या कला गुणांना वाव मिळाला तसेच त्यांची शारीरिक तसेच बौध्दीक वाढ व्हावी यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी शाळेचे संचालक अतुल धावडे यांनी सांगितले. विजेत्या मुलामुलींना पदक तसेच बक्षिसपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, माजी सरपंच बबन धावडे, जागतिक वेटलिफ्टर ज्योती भादेकर, शांताराम गाढवे, शाळेच्या संचालीका सोनाली धावडे, अतुल धावडे, सुवर्णा धावडे, गणेश गोवांडे, महेश भादेकर आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!