
योध्दा जिम येथे शिवजयंती निमित्त रक्तदान करताना नागरीक
लोकनीती न्युज नेटवर्क
वारजे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प केला. वारजे येथे पार पडलेल्या रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रसेवा सेवा समूह आणि योध्दा जिम यांच्या वतीने करण्यात आले होते. शाहीर श्रीकांत शिर्के यांच्या शाहिरी पोवाड्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले. यावेळी निलेश बोडके यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगत नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले. या शिबिरात सुमारे २५१ दात्यांनी रक्तदान केले. विशेषतः युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

आयोजकांनी रक्तदात्यांना प्रमाणपत्र, हेल्मेट आणि सॅक बॅग देऊन त्यांचा सन्मान केला. या उपक्रमाबाबत बोलताना निलेश बोडके म्हणाले, “शिवजयंती केवळ उत्सव साजरा करण्याचा दिवस नसून समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची संधी आहे. रक्तदान हीच खरी शिवरायांना आदरांजली आहे.” शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले आणि अशा उपक्रमांना भविष्यातही पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमासाठी हनुमंत पांचाळ, सोमनाथ काळे, राहुल मोरे, सागर भोगावले, अमित राऊत, निलेश भोगावले, अमित कडू यांनी विशेष परिश्रम केले.