|

मुख्याध्यापिका संगीता सावंत यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न

लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : शिवणे येथील नवभारत हायस्कूल शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापिका संगीता संभाजी सावंत यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, शाळा प्रशासन आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत उत्साहात आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन तसेच कै. बा. रा. घोलप आणि कै. मामासाहेब मोहोळ यांच्या पूजनाने झाली. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासह उपसचिव एल. एम. पवार, खजिनदार ॲड. मोहन देशमुख, जनसेवा उत्कर्ष स्वयंसेवा बचत गटाचे अध्यक्ष मा. सुरेश आण्णा गुजर, माजी विद्यार्थी अतुल दांगट, सचिन दांगट, सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक मानसिंग जगताप, मांडकी गावचे ग्रामस्थ, विविध शाळांचे मुख्याध्यापक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संगीता संभाजी सावंत यांनी आपल्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत शाळेचा शैक्षणिक आणि सर्वांगीण स्तर उंचावला. त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली शाळेने तालुका आणि जिल्हास्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले. कार्यक्रमात विद्यार्थिनी वैष्णवी वाडेकर हिने भावस्पर्शी भाषण केले, उपशिक्षक सचिन विटेकर यांनी गीतगायन सादर केले, रेश्मा गायकवाड यांनी कविता सादर केली, तर मीनाक्षी जगताप यांनी मानपत्र वाचन केले. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. मुख्याध्यापिका मॅडम यांचा शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन संस्थेच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याचा आढावा घेत सन्मानपत्र देण्यात आले, ज्यामुळे उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आले. या कार्यक्रमात त्यांच्या आई-वडिलांची विशेष उपस्थिती होती. आपल्या उत्तरभाषणात संगीता संभाजी सावंत यांनी सहकाऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे आणि ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या भावस्पर्शी भाषणाने वातावरण भारावले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य शिवराम साबळे यांनी केले, सूत्रसंचालन रविंद्र गोलांडे आणि अमृता खराडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक अंकूश खोपडे यांनी केले.
हा गौरव सोहळा संगीता सावंत यांच्या चार दशकांच्या समर्पित सेवेला दिलेला आदर होता, ज्याने उपस्थितांच्या मनात त्यांच्या कार्याची अमिट छाप सोडली.

इतरांना शेअर करा

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

All content, images, and materials published on Lokniti News are provided for general information and public awareness purposes only. While every effort is made to ensure accuracy and authenticity, Lokniti News does not make any warranties, express or implied, regarding the completeness, reliability, or accuracy of the information. All images, videos, and other media used on this website are either created by Lokniti News, used with permission, or believed to be in the public domain. If any copyrighted material has been used inadvertently, it is purely unintentional. The concerned copyright owner may contact us for correction or removal. Unauthorized use, reproduction, or distribution of any content from this website is strictly prohibited and may invite legal action under the Indian Copyright Act, 1957. By accessing this website, you agree that any disputes arising out of or related to its use shall be subject to the exclusive jurisdiction of the courts at Pune, Maharashtra, India. © 2025 Lokniti News. All Rights Reserved.

error: Content is protected !!