
लोकनीती न्यूज मीडिया
पुणे : दलित, ओबीसी, अल्पसंख्यांक आणि आदिवासी घटकांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या “डोमा संघटना” च्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी मा. राजेश जी गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.संघटनेचे राज्य स्तरावरील पदाधिकारी आणि प्रमुख मार्गदर्शकांच्या उपस्थितीत ही नियुक्ती घोषित करण्यात आली. त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली असून, भविष्यात त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

राजेश गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील वंचित घटकांसाठी सक्रिय असून, त्यांनी अनेक सामाजिक चळवळींमध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात सामाजिक न्याय, हक्क व विकासासाठी लढा अधिक प्रभावीपणे लढला जाईल, अशी अपेक्षा आहे.