
लोकनीती न्युज नेटवर्क
पुणे : भारतीय जनता पार्टीच्या चित्रपट आघाडीच्या शहराध्यक्षपदी राजीव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली चित्रपट आघाडी अधिक सक्षम आणि प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. नवीन जबाबदारी स्वीकारल्या नंतर राजीव पाटील यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले आणि चित्रपट आघाडीच्या माध्यमातून सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे, भाजपा चित्रपट कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष समीर दीक्षित, भाजपा पुणे शहर सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, चित्रपट कामगार आघाडी सरचिटणीस केतन महामुनी, भाजपा चित्रपट कामगार आघाडी वरिष्ठ उपाध्यक्ष अजित परब, स्विकृत नगरसेवक सचिन दांगट हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी शरद पाटील, रोशनी नागदेवते, शिव माने, विनोद राजे, योगेश इंगळे, अमित शेरखाने, नितीन भास्कर, करण दौंड यांना कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्तीचे पत्र देण्यात आले.