|

मनीषा थिएटर लेन परिसरात शिवजयंती उत्साहात

लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : मनीषा थिएटर लेन परिवाराच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने शिवज्योत पूजन, शिव वंदना, पालखी सोहळा तसेच युवा लोककलावंत अनिल शिवाजीराव केंगार यांचे भारुड अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिसरात जय भवानी, जय शिवाजीच्या गजराने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवजयंती उत्सवात महिलांची उल्लेखनीय उपस्थिती पाहायला मिळाली. पालखी सोहळा, शिववंदना आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने सोहळ्याला विशेष उत्साह आणि रंगत आली.

कार्यक्रमाचे आयोजन रवींद्र पायगुडे, राजू पवार, लक्ष्मण जोरी, संजय मांजरे, महादेव गिरीगोसावी, ऋषिकेश पाटील, संतोष दरेकर, सुनील नालगुडे यांनी केले होते. या सोहळ्यात स्थानिक नागरिक आणि शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!