|

आनंदीबाई कर्वे विद्यालयामध्ये शिवजयंती सोहळा उत्साहात

लोकनीती न्युज नेटवर्क
पुणे : सकल हिंदू समाजाचे आराध्य दैवत, युगपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या सोहळ्यास हिंदू जागरण समितीच्या संभाजी भागाच्या सहसंयोजिका मा.संजीवनी चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. पाहुण्यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमापूजनानंतर विद्यालयाच्या प्राचार्या मा. सुनंदा देशमुख यांनी प्रास्ताविक केले. यानंतर विद्यार्थिनींचे सादरीकरण घेण्यात आले.

इ. १ ली ते ४ थी शस्त्र चित्र काढून रंगवणे स्पर्धा व सादरीकरण तसेच इ. ५ वी ते ७ वी तील विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर आणि चारुदत्त आफळे यांनी लिहिलेले पोवाडे साभिनय सादर केले. तसेच शाळेत शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग रेखाटन या विषयावर आधारित चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचा निकाल देखील कार्यक्रमादरम्यान जाहीर रण्यात आला. कार्यक्रमास मुख्याध्यापिका सुनंदा देशमुख सर्व शिक्षक वर्ग व इयत्ता १ ली ते ७ वी तील सर्व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता वेदपाठक यांनी केले.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!